IN PICS : सलमानसोबत लग्न आणि ताजमहाल पाहण्याच्या इराद्याने भारतात आली होती सोमी अली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:11 PM2021-02-08T14:11:09+5:302021-02-08T14:18:38+5:30

आता कशी दिसते सलमान खानची ही गर्लफ्रेन्ड? सध्या कुठे आहे, काय करते?

पाकिस्तानी वंशाची सोमी अली केवळ वयाच्या 16 व्या वर्षी तिचा क्रश सलमान खानसोबत लग्न करण्याच्या इराद्याने मुंबईत आली होती. केवळ एकच वर्षात तिला सलमान भेटलाही. पे्रमाच्या चर्चाही सुरु झाल्यात. पण 1999 मध्ये सोमी व सलमानचे ब्रेकअप झाले आणि सोमी आल्या पावली अमेरिकेला परतली.

आता ही सोमी काय करतेय तर एक एनजीओ चालवतेय. अलीकडे बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोमी जुन्या आठवणीत रमली. सोबत आयुष्यात आजपर्यंत खरे प्रेम न मिळाल्याची खंतही बोलून दाखवली.

सोमी म्हणाली, 16 व्या वर्षी मी मैंने प्यार किया हा सिनेमा पाहिला आणि याच हिरोसोबत लग्न करण्याचा निश्चय पक्का केला. मी मुंबईला जातेय, म्हणून मी जिद्दला पेटले. मला ताजमहाल पाहायचेय, असे म्हणून मी मॉमला राजी केले आणि मुंबईत आले.

तिने सांगितले, मुंबईत फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून मी पोर्टफोलिया बनवला आणि अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत संधी शोधू लागले. एकदिवस सलमान खानची नजर माझ्यावर पडली आणि मी बुलंद या सिनेमासाठी आॅडिशन दिले. यानंतर मला अनेक सिनेमाच्या आॅफर मिळायला लागल्यात.

सिनेमात काम करणे म्हणजे परिकल्पनेसारखे होते. सलमान, सैफ अली खान, चंकी पांडे, मिथुन, सुनील शेट्टी अशा अनेकांसोबत मी काम केले. माझा अखेरचा सिनेमा ओम पुरींसोबतचा ‘चुप’ होता. यानंतर मी जणू बिल्कुल चूप झाले आणि भारतातून परत अमेरिकेत आले, असे तिने सांगितले.

मी फक्त सलमानसोबत लग्न करण्याच्याच इराद्याने भारतात गेले होते. माझा दुसरा काहीही उद्देश नव्हता. फिल्म इंडस्ट्री तर माझ्यासाठी नव्हतीच, असेही ती म्हणाली.

मला लग्न करायचे होते. माझी 5 मुलं असावीत, अशी माझी इच्छा होती. आता मी 40 वर्षांची आहे आणि आता मला एकही मुलं नको. अद्यापला मला माझ्यासारखा कोणी भेटलेला नाही. तो मिळालाच तर त्याच्यासोबत आयुष्य घालवायला आवडेल. सध्या तरी मी सिंगल आहे, असेही तिने सांगितले.

ताजमहाल पाहण्याच्या बहाण्याने मी भारतात आले होते. पण अद्याप मी ताजमहाल पाहिला नाही. आता भारतात आलीच तर ही इच्छा नक्की पूर्ण करेन, असेही तिने सांगितले.

सलमानकडून मी खूप काही शिकले. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत भेट नाही. पण आजही मी त्याचा आदर करते. 2 वर्षांपूर्वी सलमानच्या आईला मात्र मी अमेरिकेत भेटले होते, असे ती म्हणाली.

Read in English