Sofia Hayat ला पार्टीत बघून आउट ऑफ कंट्रोल झाला होता रोहित शर्मा, एका कारणाने झालं होतं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:09 PM2021-12-07T13:09:22+5:302021-12-07T14:04:08+5:30

Sofia Hayat : क्रिकेटर रोहित शर्माची भेट सोफिया हयातसोबत एका पार्टीमध्ये झाली होती. रोहित शर्मा परदेशात होता आणि मित्रांसोबत पार्टीला गेला होता.

काल अभिनेत्री-मॉडल सोफिया हयातचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर तिच्याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे. त्यात तिच्या आणि क्रिकेटर रोहित शर्माच्या अफेअरची चर्चा अधिक रंगली आहे. सोफिया हयात नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. पण कधीकाळी ती रोहित शर्मामुळे चांगलीच चर्चेत आली होती.

सोफिया हयातने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं की, ती रोहित शर्माला डेट करत होती. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तसेच ते कसे एकमेकांच्या जवळ आले होते, हेही तिने सांगितलं होतं.

क्रिकेटर रोहित शर्माची भेट सोफिया हयातसोबत एका पार्टीमध्ये झाली होती. रोहित शर्मा परदेशात होता आणि मित्रांसोबत पार्टीला गेला होता. तिथे त्याची भेट सोफिया हयातसोबत झाली होती.

रोहित शर्मा आणि सोफिया हयात यांची ओळख एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून झाली होती. याच कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून सोफिया आणि रोहित जवळ आणि ते एकमेकांना डेटही करू लागले होते.

सोफियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रोहित शर्माने जसं तिला पार्टीत पाहिलं, तसं त्याने तिला किस केलं होतं. त्यानंतर दोघांनी डान्स फ्लोरवर ठुमकेही लगावले होते.

या पार्टीनंतर सोफिया हयात आणि रोहित शर्माची मैत्री प्रेमात बदलली होती. दोघे एकमेकांना भेटू लागले होते आणि दोघे बरेच जवळही आले होते.

रोहित शर्माने कधीही सोफिया हयातसोबत आपल्या नात्यावर काही वक्तव्य केलं नव्हतं. इतकंच काय तर जेव्हा या दोघांबाबत मीडियात चर्चा झाली तेव्हाही रोहित गप्पच होता.

अभिनेत्री सोफिया हयातने आपल्या काही ट्विट्समध्ये अनेकदा रोहित शर्मावर निशाणा साधला होता. पण रोहित शर्मा त्यावेळीही एकही शब्द बोलला नाही.

सोफिया हयात रोहित शर्माच्या या गोष्टीवर रागावली होती की, त्याने मीडियासमोर तिला त्याची फॅन असल्याचं सांगितलं होतं. मीडियाला उत्तर देताना रोहितच्या तोंडून निघालेले हे शब्द त्याला इतके महागात पडले की, दोघांचं ब्रेकअप झालं.

ज्यावेळी रोहित शर्मा आणि सोफिया हयातच्या नात्याची चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान सोफियाचं नाव विराट कोहलीसोबतही जोडलं गेलं होतं. पण त्यांच्या नात्याबाबत जास्त काही चर्चा झाली नाही.

Read in English