SEE PICS : काजल अग्रवालने गुपचूप उरकला साखरपुडा? कोण आहे तिचा होणारा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:01 PM2020-08-17T16:01:47+5:302020-08-17T16:14:46+5:30

‘सिंघम’ची हिरोईन लवकरच अडकणार लग्नबेडीत

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल अग्रवालने गुपचूप साखरपुडा उरकल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

काजलने गौतम नावाच्या व्यावसायिकाशी गपचुप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडिया वर होत आहे.

प्रसिद्ध तेलगू अभिनेता बेलामकोंडा श्रीनिवास हा सुद्धा या साखरपुड्याला हजर होता, अशीही चर्चा आहे.

काजल ब-याच दिवसांपासून गौतमला डेट करत असल्याचे मानले जात आहे. अर्थात अद्याप काजलने जाहीरपणे याची कबुली दिली नाही.

अलीकडे एका मुलाखतीत गौतमबद्दल तिला विचारले असता, तिने यावर बोलण्यास नकार दिला होता.

मात्र होणा-या नव-यात काय काय गुण असावेत, यावर ती भरभरून बोलली होती. तो अध्यात्मिक, माझी काळजी घेणारा आणि प्रेमळ असावा, असे ती म्हणाली होती.

तिच्या वर्कफ्रंटबाबत सांंगायचे झाल्यास सध्या मोसागल्लू, आचार्य, मुंबई सागा, हे सिमिनिका असे सिनेमे काजल कडे आहेत.

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून

काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Read in English