लैंगिक शोषणाची बळी ठरली होती नेहा भसीन, घटना आठवून आजही होते अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 06:00 AM2020-11-22T06:00:00+5:302020-11-22T06:00:00+5:30

'सुल्तान' सिनेमातील 'जग घुमियाँ' या गाण्यामधून रसिकांची लाडकी गायकी बनलेली गायिका म्हणजे नेहा भसीन.सूरांच्या जादूमुळे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध आणि चर्चित गायिकांमध्ये तिचं गाव घेतलं जातं. आपल्या सूरांनी तिनं रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. आता पुन्हा एकदा नेहा भसीनची चर्चा सुरु आहे.

इंडस्ट्रीत तिने आपले स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. नेहा भसीन आता चर्चेत येण्यास एक वेगळेच कारण समोर आले आहे.

दिवसेंदिवस आपण लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचत असतो. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेक कलाकारांनीही या विषयी अनेकदा वाचा फोडली आहे.

या विषयावर पूर्वी इतके मनमोकळेपणाने बोलले जायचे नाही. मात्र आता अनेकजण त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाविषयी उघडपणे बोलतात.

नेहा भसीननेही या विषयी दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादाक खुलासा केला आहे.

अवघ्या 10व्या वर्षी नेहाला लैंगिक शोषणाचा सामना कराला लागला होता.

लहानपणी हरिद्वार याठिकाणी गेली असता तिच्यासोबत असा प्रसंग घडला असल्याचे तिने म्हटले आहे.

आजही त्या घटना आठवताच अस्वस्थ व्हायला होते.

एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र मला माझा स्वतःवर खूप विश्वास आहे.

हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ढळतो असं वाटतं त्यावेळी मी मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात असे काही लोक आहेत की त्यांच्याकडे पाहून आपुसकच प्रेरणा मिळते.