आता कुठे आहे परदेशी अल्ताफ राजा?, गायक म्हणाला - असं ऐकून वाईट वाटतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:04 PM2021-07-28T16:04:52+5:302021-07-28T16:17:52+5:30

Altaf Raja : अल्ताफ पुढे सांगतो की, 'आमच्यासारख्या आर्टिस्टला इनसिक्युर होण्याची गरज नाही. पण आजची जनरेशन जास्त इनसिक्युर आहे. कारण ते काही महिन्यात फेमस होतात. त्यांची पॉप्युलॅरिटी जास्त चालत नाही'.

'तुम तो ठहरे परदेसी' गाणं आजही लोकांच्या स्मरणात आहे. या गाण्यामुळे अल्ताफ राजा रातोरात स्टार झाला होता. लोकांमध्ये लोकप्रियता पाहून अल्ताफ राजाला बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिली गेली. मुंबईच्या मोहम्मद अली भागात राहणाऱ्या अल्ताफ राजाची 'आजतक'ने मुलाखत घेतली. त्यावेळी त्याने मनातील दु:खं बोलून दाखवलं. तो म्हणाला की, बॉलिवूडमध्ये सक्रिय असूनही लोक जेव्हा विचारतात की, अल्ताफ राजा कुठे आहे? तर वाईट वाटतं.

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याच्या आठवणींबाबत त्याने सांगितलं की, 'काही कल्ट गोष्टी बनायला वेळ लागतो. शोले सिनेमा बनायलाही वेळ लागला होता. त्याचंप्रमाणे हे गाणं तयार व्हायलाही वेळ लागला. माझा नेहमीच प्रयत्न राहिला की, मी गाण्याला शायरीने एक स्पेशल टच द्यावा. यात गाण्यात मी महिन्यांचा एक स्पेशल फॅक्टर टाकला होता. आजही तो प्रयत्न लोकांना आवडतो'.

अल्ताफ पुढे म्हणाला की, 'बालपणापासूनच गायनाचं शिक्षण घरात मिळत होतं. मी त्यावेळचा एक स्वतंत्र कलाकार होतो. अशात जेव्हा माझी गाणी लोकांमध्ये आली तर लोकांनी मला सन्मान दिला. हे गाणं माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता. यानेच मला सिनेमे दिले. या गाण्यानंतर अनेक म्युझिक प्रोड्युसरची लाइन लागली होती'.

सध्या कामाबाबत अल्ताफने सांगितलं की, 'मला फार वाईट वाटतं जेव्हा लोक मला विचारतात कुठे गायब झाले. तुम्ही सिनेमात का येत नाही. पण मी तर सतत सक्रिय आहे. मी घनचक्कर, हंटरसारख्या सिनेमात गाणी गायली आहेत. दरवर्षी माझं गाणं रिलीज होतं. काही दिवसांपूर्वीच इंदौरी इश्क सिनेमा रिलीज झाला. बस लोक ओळखत नाहीत'.

रागात अल्ताफ राजा म्हणाला की, लोक आता सपना चौधरीसारख्या लोकांना लाइमलाइट करतात. सोशल मीडियावर सपना चौधरीची चर्चा होत राहते. तुम्हीच सांगा तिचं कोणतं गाणं वर्ल्डवाइट हिट झालं आहे. तरी तिला महत्व दिलं जातं. जे नेहमीच चालतात त्यांचं काम दाखवलं जात नाही'.

रोज नवेपणा येण्यासाठी आपण म्युझिकची हालत वाईट केली आहे. आता मेलोडीच्या शोधात लोक जुन्या गायकांना शोधत आहेत. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आता मोनोपोली चालत आहे. काही मोजकेच लोक आता इंडस्ट्री चालवत आहेत. आमच्या काळात कॅसेट विकल्या जाणाऱ्यावरून कलाकाराची लोकप्रियता मोजली जात होती. आता सगळं काही व्ह्यूजवर आहे. आता व्ह्यूज खरेदी केले जातात.

आपल्या लोकप्रियतेवर अल्ताफ राजा सांगतो की, 'आम्ही कलाकारांमध्ये ईर्षेची भावना नसते. आज मी २५ वर्षापासून इंडस्ट्रीत आहे आणि आपल्या जागेवर कायम आहे. ठिकठिकाणी शोज करतो. देशातील वेगवेगळ्या भागात लोक अल्ताफ राजा, नदीम-श्रवणची गाणी ऐकणं पसंत करतात. ढाब्यांपासून ते ट्रकमध्ये आमची गाणी चालतात'.

अल्ताप पुढे सांगतो की, 'आमच्यासारख्या आर्टिस्टला इनसिक्युर होण्याची गरज नाही. पण आजची जनरेशन जास्त इनसिक्युर आहे. कारण ते काही महिन्यात फेमस होतात. त्यांची पॉप्युलॅरिटी जास्त चालत नाही'.

रिअॅलिटी शोजबाबत अल्ताफ राजा म्हणाला की, 'मला अनेकदा या शोजसाठी कॉल आले आहेत. पण मी फकीर पद्धतीचा माणूस आहे. मला १२ ते १५ तास बांधून राहणं जमणार नाही. शोमध्ये चालणारा ड्रामा आणि अॅक्टिंगचा भाग मला व्हायचं नाही'.

'मी आजही मुंबईच्या ज्या भागातून आहे तिथेच राहतो. लोकप्रियता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. साधं जीवन जगतो. काही दिवसांपर्वी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. ज्यावर गाणी आणि शायरी टाकतो. अशाप्रकारे आपल्या कामात सक्रिय आहे. स्टेज शोसोबतच सिनेमातही काम करतो. अखेरचा सिनेमा इंदौरी इश्क होता.