Uff!! श्वेता तिवारीच्या लेकीचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा पलकचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 01:42 PM2022-04-21T13:42:23+5:302022-04-21T13:49:54+5:30

Palak Tiwari Sizzling Photoshoot : पलक तिवारीचा लवकरच बॉलिवूड डेब्यू होतोय आणि त्याआधी तिची जोरदार चर्चा आहे. या ना त्या निमित्तानं गेल्या काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. पण तिची लेक पलक तिवारी ही सुद्धा कमी नाही.

पलक तिवारीचा लवकरच बॉलिवूड डेब्यू होतोय आणि त्याआधी तिची जोरदार चर्चा आहे. या ना त्या निमित्तानं गेल्या काही दिवसांपासून ती सतत चर्चेत आहे.

कधी सैफ अली खान व अमृता सिंगचा लेक इब्राहिम अली खानसोबतच्या व्हिडीओमुळे तर कधी आई श्वेताबद्दलच्या वक्तव्यामुळे पलकची चर्चा रंगलीये.

सध्या तिचे ताजे फोटोही चर्चेत आहेत. होय, पलकने एक ग्लॅमरस फोटोशूट केलंय. पिंक कलरच्या ड्रेसमधील पलकची एक एक अदा बघण्यासारखी आहे.

पिंक ड्रेस, हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये पलक खूप सुंदर दिसत आहे. पलकच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

माझी आई माझ्या एका मित्राची क्रश होती. तुझी आई किती हॉट आहे, असं तो मला म्हणाला होता, असं नुकतंच एका मुलाखतीत पलक तिवारीने सांगितलं.

आई श्वेतासोबत पलकचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. लेकीचा बॉलिवूड डेब्यू होतोय म्हटल्यावर आई जाम खूश्श आहे.

अलीकडे पलकने हार्डी संधूसोबत ‘बिजली बिजली’ म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. लवकरच ती ‘ ’ या चित्रपटात ती दिसणार आहे.