श्रिया सरन फॅमिलीसोबत गोव्यात व्हॅकेशन करतेय एन्जॉय, मुलीसोबत पाण्यात मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 06:24 PM2022-05-11T18:24:29+5:302022-05-11T18:44:50+5:30

श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.यानंतर 2002 मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. (Photo Instagram)

या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. 2007 मध्ये ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते.याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. (Photo Instagram)

2018 मध्ये श्रियाने रशियन बॉयफ्रेन्ड आंद्रेई कोशेवसोबत (Andrei Koscheev) लग्नगाठ बांधली होती. दोघांचीही भेट मालदीवमध्ये झाली होती.(Photo Instagram)

लग्नानंतर श्रिया तिच्या पतीसोबत बर्सिलोनामध्ये राहत होती. मात्र 2020 मध्येच तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. तथापि लॉकडाऊनदरम्यान दोघेही बार्सलोनामध्ये अडकून पडले होते. आता मात्र ती व तिचे कुटुंब भारतात परतले आहे.(Photo Instagram)

श्रिया आणि आंद्रेईला एक मुलगीदेखील आहे. गोव्यात सध्या ते व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. सोशल मीडियावर श्रियाने गोव्यातील फोटो शेअर केलेत. (Photo Instagram)

अलीकडेच श्रिया सरन एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात दिसली होती. एका छोट्या भूमिकेसाठी तिला तब्बल 1 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)