IN PICS : कॉलेज सेक्रेटरीवर असा काही फिदा झाला श्रेयस तळपदे की चौथ्या दिवशीच केलं प्रपोज...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:28 AM2021-01-27T11:28:44+5:302021-01-27T11:38:19+5:30

आज श्रेयसचा वाढदिवस. श्रेयस आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करतोय.

त्याने तिला पहिल्यांदा पाहिले आणि पहिल्याच नजरेत तिने त्याला क्लीनबोल्ड केले. पुढे जोडीदार होऊन ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे अख्खे आयुष्यच पालटले. आम्ही बोलतोय ते अभिनेता श्रेया तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती या गोड जोडप्याबद्दल.

आज श्रेयसचा वाढदिवस. श्रेयस आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला श्रेयस व दीप्तीची फिल्मी लव्हस्टोरी सांगणार आहोत.

तर कॉलेजमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्याचे निमित्त झाले आणि दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी श्रेयसला दीप्ती पाहताक्षणी आवडली तर दीप्तीला श्रेयसचा साधेपणा भावला.

2000 रोजी श्रेयसला कॉलेजच्या एका फेस्टसाठी बोलवण्यात आले होते. कॉलेजच्या त्याच फेस्टिवलमध्ये दीप्ती सेक्रेटरी होती. श्रेयसला दीप्तीशी पहिल्या नजरेतच प्रेम झाले.

श्रेयस दीप्तीसाठी असा काही वेडा झाला होता की पुढे चार दिवसांतच त्याने दीप्तीला प्रपोजही केले. दीप्तीने होकार दिला आणि मग दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले.

2004 साली श्रेयस व दीप्ती लग्नबंधनात अडकले. 14 वर्षांनंतर 4 मे 2018 मध्ये श्रेयस आणि दीप्ती सरोगसीद्वारे आई-बाबा बनले असून त्यांना एक मुलगी आहे.

दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो. करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो.

27 जानेवारी 1976 मध्ये मुंबईत श्रेयसचा जन्म झाला. मराठी टीव्ही शोमधून श्रेयसने आपल्या अभिनयातील करियरला सुरुवात केली.

2005 मध्ये श्रेयसने ‘इक्बाल’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात केलेल्या अभिनयाने त्याचं सर्वत्र जबरदस्त कौतुक झाले.

‘इक्बाल’नतंर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांतून श्रेयसने साकारलेल्या महिला भूमिकांनाही, त्याचा लुक, कॉमेडी, अभिनयाला चाहत्यांची भरभरुन दाद मिळाली.