Romantic Photo : ‘या’ हँडसमसोबत धुमधडाक्यात होणार होते शमा सिकंदरचे लग्न, पण...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:18 PM2020-05-22T14:18:10+5:302020-05-22T14:32:59+5:30

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे अनेक जोडप्यांच्या लग्नांचा प्लॅन फसलाय. अभिनेत्री शमा सिकंदर हिच्या होऊ घातलेल्या लग्नातही कोरोनाचे विघ्न निर्माण झाले आहे.

अभिनेत्री शमा सिकंदर बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

शमा दीर्घकाळापासून अमेरिकन बिझनेसमॅन जेम्स मिलिरॉनला डेट करतेय.

अनेक वर्षे डेट केल्यानंतर 2016 साली दोघांचा साखरपुडा झाला होता.

यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोघेही लग्न करणार होते. पण लॉकडाऊनमुळे सप्टेंबरमधील या लग्नाची सुुरू असलेली तयारी तूर्तास थांबवण्यात आली आहे.

आमच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. सप्टेंबरच्या शेवटी आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करणार होतो. पण कोरोना आल्यामुळे सध्या सगळे काही ठप्प आहे, असे शमाने सांगितले.

जेम्सच्या आईवडिलांकडे पासपोर्ट नव्हता. ते पासपोर्ट काढणार असताना कोरोना महामारी सुरु झाली. आमच्या मते, आणखी काही महिने तरी प्रवास करणे योग्य नाही, असेही तिने सांगितले.

जेम्स माझ्यासोबत मुंबईत आहे. पण त्याचे आईवडिल अमेरिकेत आहेत. कोरोनामुळे अमेरिकेतील स्थिती भीषण आहे. अशास्थितीत आम्हाला त्या दोघांचीही काळजी वाटते आहे, असेही ती म्हणाली

या कोरोनाच्या काळात जेम्स माझ्यासोबत आहे, हे भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आाहे. आम्ही दोघेही नवे बदल स्वीकारत आहोत, असेही तिने सांगितले.

शमा सिकंदर ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.

ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमधून शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्येही शमा दिसली होती. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.