शमा सिकंदरच्या बोल्ड अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:13 PM2019-03-25T13:13:11+5:302019-03-25T13:19:07+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच इंस्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. नुकताच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले. ज्यात ती खूप हॉट व बोल्ड वाटते आहे.

शमाच्या या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. इतकेच नाही तर आतापर्यंत या फोटोला ५७ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

शमाने 'माया' वेब सीरिज व 'सेक्सोहॉलिक' शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे.

वेब सीरिज 'माया' व लघुपट 'सेक्सोहॉलिक'ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

'ये मेरी लाइफ है' मालिकेतून शमा सिकंदर घराघरात पोहचली.

शमाने वयाच्या १६व्या वर्षी 'प्रेम अगन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर शमा आमीर खान व मनीषा कोईराला अभिनीत 'मन' चित्रपटात झळकली होती.

तसेच शमाने बऱ्याच मालिकेत, रिएलिटी शो व कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.