लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिया कपूरचा बोल्ड फोटो प्रचंड होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:53 PM2021-08-19T14:53:33+5:302021-08-19T15:08:02+5:30

बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर बॉयफ्रेंड करण बूलानी विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करतात आणि जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसायचे.

लग्न करत दोघांनी आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. लग्नात रिया फार सुंदर दिसत होती.

यावेळी रियाचा हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तिच्या लग्नामुळेच रिया चर्चेत आहे.

सोशल मीडियावर या लग्नासोहळ्यातले खास क्षणाचे फोटोही व्हायरल झाले होते.

लग्नाचे फोटो व्हायरल होत असतानाच रिया कपूरचा आणखी एक फोटो चर्चेत आहे.

लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा बिकीनी फोटो व्हायरल झाला होता. तिचा हा फोटो नवीन नसून जुनाच आहे.

काही महिन्यांपूर्वीच तिने हा फोटो शेअर केला होता.पण लग्नानंतर तिचा हा जुना बिकीनी फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे.

या फोटोमुळे तिच्या बिकीनी लूकचीही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

सेलिब्रेटींचे बिकीनी फोटो व्हायरल होणे यात काही नवीन नाही. रिया पहिल्यांदाच इतक्या बोल्ड लूकमध्ये दिसते असे नाहीय.

याआधीही तिने बोल्ड फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले होते. रिया बहिण सोनमप्रमाणे अभियक्षेत्रात नसली तरी निर्माती म्हणून ती काम करते.

निर्माती असण्यासोबतच ती बिझनेसही करते. तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे.