प्रमोशन होते म्हणून मीडियाला बघताच क्षणात बदलला सारा अली खानचा अंदाज,पाहणारे पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:07 PM2020-11-09T12:07:02+5:302020-11-09T12:14:15+5:30

सध्या सारा अली खान आगामी सिनेमा 'कुली नं-1' चे जोरदार प्रमोशन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी मीडियाच्या कॅमेरे पाहतचा मोठ्या आदराने ती सगळ्यांना तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पोजवर पोज देताना पाहायला मिळते.

तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे साराचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

तसेच आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.