सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:56 PM2021-10-11T16:56:44+5:302021-10-11T17:03:27+5:30

Samantha Ruth Prabhu : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत.

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. तूर्तास या घटस्फोटाचीच चर्चा आहे. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत.

सांथा एका डिझाईनरला डेट करत असल्याची आणि यामुळेच तिने नागासोबत घटस्फोट घेतल्याची चर्चा तर आणखीच जोरात आहे. सामंथाने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पण याऊपरही चाहते ऐकायला तयार नाहीत.

होय, सामंथा स्टायलिस्ट प्रीतम जुकलकरला डेट करत असल्याच्या चर्चा ऐकून नागाचे फॅन्स संतापले आहेत. आता काय तर प्रीतमला म्हणे जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

अनेक नेटकरी प्रीतमला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. प्रीतममुळेच सामंथा व नागा याचं नातं तुटलं, हे खरं मानून नागा चैतन्यचे चाहते प्रीतमला धमकावत आहेत.

आता अशात सामंथाचे चाहते मागे का राहणार? समांथाच्या चाहत्यांनी प्रीतमला पाठिंबा दिलाय. प्रीतम कायम समांथाला जीजी म्हणजेच बहिण म्हणून हाक मारतो, असं म्हणून त्यांनी प्रीतमचा बचाव केला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रीतमने ‘महिलांवरील हिंसा’ अशी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे देखील तो चांगलाच चर्चेत आला होता. या पोस्टचा संबंध नागा चैतन्य व सामंथाच्या वैवाहिक आयुष्याशी जोडण्यात आला होता.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.