'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीने शेअर केले सुंदर फोटो, कॅप्शनमध्ये लिहिले की,आज ब्लू है पानी पानी पानी...पूल पार्टी मस्ती...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 05:49 PM2021-02-15T17:49:44+5:302021-02-15T17:49:44+5:30

हर्षाली मल्होत्रा एक भारतीय बालकलाकार आहे. नुकतेच बजरंगी भाईजानमधील मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्राने काही फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हर्षाली मल्होत्राने फोटो शेअर करत लिहिले की, आज ब्लू है पानी पानी पानी पानी..पूल पार्टी मस्ती..! या फोटोत मुन्नी खूप सुंदर दिसते आहे.

हर्षालीने बजरंगी भाईजानमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

या चित्रपटातून मुन्नी घराघरात पोहचली आहे.

बजरंगी भाईजानमध्ये सलमान खाननंतर जास्त चर्चेत आले ती मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्रा.

बजरंगी भाईजानमधील शाहिदाच्या भूमिकेसाठी जवळपास १००० मुलींनी ऑडिशन दिले होते. त्यातून हर्षालीची निवड झाली होती.

बजरंगी भाईजानमध्ये हर्षालीचा एकही डायलॉग नाही. तरीदेखील प्रेक्षकांना ती खूप भावली होती.

हर्षाली मल्होत्राने करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती.