'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 02:00 PM2021-11-14T14:00:00+5:302021-11-14T14:00:00+5:30

Salman khan: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. सोबतच 'जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं', हे त्यांने सांगितलं आहे.

भाईजान, दबंग खान अशा एक ना अनेक नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत असलेल्या सलमानने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

सध्या सलमान त्याच्या आगामी 'अंतिम' चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चर्चांमध्येच सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या करिअरविषयी भाष्य करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. सोबतच 'जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं', हे त्यांने सांगितलं आहे.

अलिकडेच कार्तिकने 'बिग बॉस १५'च्या मंचावर हजेरी लावली होती. कार्तिक त्याच्या आगामी 'धमाका' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या मंचावर आला होता. यावेळी सलमान- कार्तिक एक मजेशीर खेळ खेळताना दिसतात.

'कार्तिक तू धमाका चित्रपटात रिपोर्टरची भूमिका साकारत आहेस? तर मग मी तुझी एक परिक्षा घेतो. मी काही प्रश्न विचारतो, त्याची तू उत्तर दे.. ',असं म्हणत सलमान कार्तिकला काही प्रश्न विचारतो आणि त्यावर कार्तिकही मजेशीर उत्तर देतो.

"मला कोणत्या ठिकाणी सुट्टी घालवायला आवडते. हिल स्टेशन की बीच?" यावर कार्तिक म्हणतो 'पनवेलचं फार्महाऊस'. त्यानंतर सलमान विचारतो, "जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं?" या प्रश्नाचं उत्तर कार्तिकलाही देता आलं नाही. त्यामुळे सलमाननेच या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"जर सलमान खान अभिनेता नसता तर तो दिग्दर्शकीय क्षेत्रात असता आणि तुम्ही दिग्दर्शक सलमान खानसोबत काम करत असते", असं सलमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मी दिग्दर्शक असतो तर माझ्यासोबत कोणती प्रतिस्पर्धीदेखील नसता."

"सर मला तुमच्या चित्रपटात घ्या", असं कार्तिक म्हणाला.दरम्यान, यावेळी मजेमध्ये का होईना पण त्याला अभिनयाव्यतिरिक्त अन्य कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं होतं हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे जर सलमान अभिनेता नसता तर त्याने दिग्दर्शकीय क्षेत्रात नशीब आजमावलं असतं हे यावरुन स्पष्ट झालं.