पहिला सिनेमा फ्लॉप होताच या ‘मिर्झिया गर्ल’च्या हातून गेले अनेक प्रोजेक्ट, पाहा HOT फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:24 PM2020-06-02T12:24:25+5:302020-06-02T12:38:07+5:30

'मिर्झिया गर्ल' चे स्वीमसूट शूट, समोर आले Photos

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत ‘मिर्झिया’ या सिनेमातून डेब्यू करणारी सैयामी खेर आठवते? होय, राकेश ओम प्रकाश मेहरांच्या आगामी मिर्झिया या सिनेमातून तिने डेब्यू केला होता.

दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, नर्गिस फाखरीप्रमाणेच सैयामीसुद्धा किंगफिशर गर्ल बनून लाइमलाइटमध्ये आली.

2012 च्या किंगफिशर कॅलेंडरसाठी सयामीने बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट केले होते.

मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर आता तिने आपला मोर्चा सिनेसृष्टीकडे वळवला.

‘मिर्झिया’ यातून सैयामीचा ग्रॅण्ड डेब्यू झाला. पण तिचा पहिलाच सिनेमा दणकून आपटला. पहिलाच प्रोजेक्ट फ्लॉप झाल्यानंतर सैयामीला अनेक प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

ताज्या मुलाखतीत सैयामी यावर बोलली. ‘मिर्झिया’नंतर माझ्या हातात दोन प्रोजक्ट होते. पण ‘मिर्झिया’फ्लॉप झाल्यानंतर मला एका प्रोजक्टमधून काढून टाकण्यात आले.

बॉलिवूडमध्ये यशअपयश तुमच्या कामाचा भाग आहे आणि यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहणे गरजेचे आहे. हीच इथली कामाची पद्धत आहे, असेही ती म्हणाली.

बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर सैयामीने मराठी इंडस्ट्रीत डेब्यू केला.

रितेश देशमुखसोबत ‘माऊली’ या सिनेमातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत.

आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी या सैयामीच्या आत्त्या आहेत.

अभिनेत्री तन्वीनी रितेशसोबत मराठी चित्रपट ‘लय भारी’ केला आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती.