सैफने मुलासह करण जोहरची घेतली भेट, सारानंतर इब्राहिमच्या पदार्पणाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:40 PM2021-03-27T14:40:10+5:302021-03-27T14:53:47+5:30

Ibrahim Ali Khan was spotted today outside Karan Johar's Dharma Production office: इब्राहिमच नाही तर त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं असे सैफने सांगितले होते.

सैफ अली खान काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

इब्राहिमच नाही तर त्याच्या प्रत्येक मुलाने बॉलिवूडमध्ये आपलं करिअर बनवावं असे सैफने सांगितले होते.

जग फार बदललं आहे आणि स्वत:ला सिद्ध करणं, आपली जागा निर्माण करणं आधीपेक्षा खूप कठिण झालं आहे.

त्यामुळे इब्राहिमने मेहनत करावी आणि योग्य सिनेमांची निवड करावी असे सैफने त्याला सल्लाही दिला होता.

नुकतेच पापा सैफ अली खानसह इब्राहिम बॉलिवूडचा डॅडी करण जोहरच्या ऑफिसमध्ये भेटायला गेल्याचे फोटो समोर आले आहेत.

करण जोहरच्या ऑफिसमध्ये भेट झाल्याने नक्कीच इब्राहिम करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशा चर्चा आहेत.

त्यामुळे आगामी काळात सारा प्रमाणेच इब्राहिम रुपेरी पडद्यावर झळकलाच तर आश्चर्य वाटायला नको.

इब्राहिम अगदी हुबेहुब सैफ अली खान सारखा दिसतो. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो.

त्याच्या प्रत्येक अंदाजातील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करतो.

विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर झळकण्याआधीच तो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय स्टारकिड आहे.