PHOTOS : सई मांजरेकरनं मॅगझिनसाठी केलं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:09 PM2022-04-26T14:09:13+5:302022-04-26T14:14:15+5:30

Sai Manjrekar : निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरनं सलमानसोबत ‘दबंग 3’मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. सध्या सईची एका वेगळ्याच कारणानं चर्चा आहे.

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरनं सलमानसोबत ‘दबंग 3’मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. सध्या सईची एका वेगळ्याच कारणानं चर्चा आहे. (photos-FHM India)

होय, सईचं ग्लॅमरस अन् बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. ‘एफएचएम फिट’ या मॅगझिनसाठी तिनं हे फोटोशूट केलं आहे.

‘एफएचएम फिट’च्या एप्रिल महिन्याच्या कव्हरपेजवर सई झळकली आहे. सईने या फोटोशूटचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

या फोटोत सई एकापेक्षा एक ग्लॅमरस पोझ देताना दिसतेय. तिचा हटके मेकअप लक्ष वेधून घेतोय.

सई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. तिने सलमान खान सोबत ‘दबंग 3’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

‘दबंग 3’नंतर सई आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात दिसली होती. लवकरच ती ‘मेजर’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय घानी नावाचा चित्रपटही तिने साईन केला आहे.

सई मध्यतंरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. सई प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला याला डेट करत असल्याची चर्चा होती.