श्रद्धा कपूरने कुटुंबासमवेत त्यांच्या बाप्पाचं केलं विसर्जन, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 04:22 PM2019-09-04T16:22:20+5:302019-09-04T16:24:58+5:30

काल दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या घरी देखील दीड दिवसांच्या बाप्पांचं आगमन झालं होतं आणि काल बाप्पाचं विसर्जनही करण्यात आलं.त्यावेळी तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

श्रद्धा कपूरसोबत गणपती विसर्जनवेळी तिचे वडील शक्ती कपूर व आई शिवांगी कपूर उपस्थित आहे.

श्रद्धा कपूरचा ट्रेडिशनल ड्रेसमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रद्धाचा नुकताच साहो चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत प्रभास आहे.

या चित्रपटातून श्रद्धाने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.

साहो चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींची कमाई केली आहे.

याशिवाय श्रद्धा छिछोरे चित्रपटात झळकणार आहे.

छिछोरे चित्रपटात श्रद्धासोबत सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.