गेल्या काहीच दिवसांत इतक्या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप, वाचून येईल डोळ्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:45 PM2020-06-02T17:45:59+5:302020-06-02T18:12:50+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खानचं २९ एप्रिलला वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. इरफानची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता.

३० एप्रिलला ऋषी कपूर यांनी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. त्यांची तब्येत ढासळली असल्याने २९ एप्रिलला रात्री त्यांना तिथे दाखल करण्यात आले होते

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानचे १ जूनला किडनी आणि कोरोनाच्या आजारामळे निधन झाले. वयाच्या 42 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिने नैराश्यातून आत्महत्या केली.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे २३ मे ला निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाले.

आनंद, रजनीगंधा यांसारख्या चित्रपटांना सुपरहिट गाणी देणाऱ्या गीतकार योगेश गौर यांचे २९ मे ला निधन झाले. इंडस्ट्रीत त्यांना योगेश या नावानेच सगळे ओळखत असत. ते ७७ वर्षांचे होते. आनंदमधील त्यांनी लिहिलेले कहीं दूर कभी दिन ढल जाएँ चाँद सी..., जिंदगी कैसी है ये पहेली ही गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे.

टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत २० मे ला आत्महत्या केली

हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे १० मे ला निधन झाले. साईप्रसाद हा हा गेली दोन वर्ष ग्लायोब्लास्टोमाने (ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी साडे सातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो क्राइम पेट्रोलमधील अभिनेता शफीक अन्सारी यांचे १० मे ला निधन झाले आहे. शफीक गेल्या काही काळापासून कॅन्सरशी सामना करत होते.

सचिन कुमारने स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की' आणि सोनीवरील 'लज्जा' मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहत्या घरी ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात १६ मे ला सचिनचे निधन झाले. त्याचे वय ४२ वर्षे होते.