सुशांत सिंग राजपूतच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली रिया चक्रवर्ती, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:35 PM2020-06-15T15:35:56+5:302020-06-15T15:48:07+5:30

कूपर रूग्णालयाबाहेरचे फोटो

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठीसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती कूपर हॉस्पीटलमध्ये पोहोचली. रूग्णालयाच्या बाहेर रिया पापाराझींच्या कॅमे-यात कैद झाली.

रिया व सुशांत रिलेशनशिपमध्ये होते असे मानले जात होते.

दोघांच्याही अफेअरची मीडियात जोरदार चर्चा होती. मात्र सुशांत व रियाने याची कबुली दिली नव्हती.

सुशांत रियासोबत लग्न करणार होता. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याचा लग्नाचा प्लान होता, अशी माहितीही समोर येतेय.

यावेळी रिया चक्रवर्ती प्रचंड दु:खी दिसली. काही फोटोत तिच्या मित्रांनी तिला आधार दिल्याचेही दिसले.

सुशांतने मृत्यूपूर्वी रियाला कॉल केला होता, असे पोलिस तपासातून समोर आले आहे.

मुंबई पोलिस रियाचीही चौकशी करणार आहेत.

सुशांतच्या पार्थिवावर काही तासांत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे वडील आणि कुटुंबीय पाटण्याहून मुंबईला पोहोचले आहेत.