खुलासा! २०१७ पासून अ‍ॅक्टिव होतं रियाचं ड्रग्स सर्कल, तपासातून समोर आली बॉलिवूडमधील मोठी नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:29 PM2020-09-08T13:29:29+5:302020-09-08T13:46:32+5:30

सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स अ‍ॅंगलने एनसीबी वेगाने तपास करत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्तीच्या घरातून जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ताब्यात घेण्यात आले होते.

सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स अॅंगलने एनसीबी वेगाने तपास करत आहे. यादरम्यान रिया चक्रवर्तीच्या घरातून जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ताब्यात घेण्यात आले होते. त्यातून अनेक गुपितं समोर आली आहेत. रियाच्या घरून एनसीबी टीमने मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टॅब ताब्यात घेतले असून त्यांचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे.

तपासानुसार, २०१७-२०१८-२०१९ मध्ये रियाची ड्रग्स गॅंग फार अॅक्टिव होती. तपास यंत्रणेला रियाच्या घरातून ताब्यात घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमधून या लोकांचे फोटो, व्हिडीओ आणि व्हॉट्सअॅप चॅटीग, एसएमएस आढळले आहेत.

यात बॉलिवूडचे अनेक मोठे चेहरेही दिसून आलेत. आता बॉलिवूडमधील हे मोठे चेहरे एनसीबीच्या रडारवर आले आहेत. पण आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, एनसीबी त्यांना रिया ड्रग्स कनेक्शनवरून समन पाठवेल की नाही.

आजतकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आता रिया ड्रग्स कनेक्शन प्रकरणात लवकरच मोठी अटक होऊ शकते. या केसमध्ये एनसीबी सुशांत सिंह राजपूतचा नोकर नीरज याची चौकशी करू शकतात. नीरजकडून रिया, मिरांडा आणि शोविकबाबात महत्वाची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, रियाने चौकशी दरम्यान सांगितले की, सुशांत हा २०१६ पासून ड्रग्सचं सेवन करत होता. रियाला जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यातील काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं ती देऊ शकली नव्हती. जसे की, तुझ्या घरी डग्स आणलं जात होतं का?, यूरोप ट्रिपहून आल्यावर सुशांत रियाच्या घरी थांबला होता का?, तिथेही ड्रग्स आणलं होतं का? सुशांत मुंबईच्या ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथेही ड्रग्स आणलं होतं का?, ड्रग्स खरेदी करण्यासाठी सुशांतच्या पैशांचा वापर होत होता का?, अशा अनेक प्रश्नांवर रिया काहीच उत्तर देऊ शकली नाही.

आतापर्यंत चौकशी दरम्यान रियाने साधारण ८० टक्के प्रश्न आणि आरोपांवर उत्तर दिलं आहे. पण अनेक प्रश्नांवर ती गप्प आहे. जर रियाने तिच्या जबाबात काही मान्य केलं तर ते NDPS अॅक्टनुसार मान्य होतील.

सोमवारी रियाने शौविकसाठी काही कपडे आणले होते. तसेच लंचमध्ये त्याने बर्गरची डिमांड केली होती. जे त्याला दिलं गेलं. एनसीबीकडून सांगण्यात आले की, रिया चौकशीत सहकार्य करत आहे. अशात आता चौकशी सुरू राहील, पुढे अटक होऊ शकते.

दरम्यान एबीपीच्या रिपोर्टनुसार, रविवारी झालेल्या चौकशी दरम्यान जेव्हा रियाचा सामना भाऊ शौविकशी झाला तेव्हा बहीण-भाऊ दोघे भावूक झाले होते. दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले. रिया आणि शौविकच्या या इमोशनल कार्डमुळे एनसीबीला त्यांची चौकशी वेळेपूर्वीच संपवावी लागली. रिपोर्टनुसार, शौविकला पाहून रिया रडू लागली आणि शौविकच्या डोळ्यातूनही पाणी येऊ लागले.

रियाने सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतरांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती यांनी सुशांतसिंग राजपूत यांचे बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनविण्यावरून ही तक्रार दाखल केली आहे. एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि टेल मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत तक्रार दिली आहे.

रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ८ जून रोजी रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंग राजपूत यांची बहीण प्रियंका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करून घेतलं होतं. सतीश डॉक्टर तरुणकुमार डॉक्टरांनी लिहिलेली औषधे एनडीपीएस कायद्यांतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे.