Rekha Birthday: रेखा यांचे आतापर्यंत न पाहिलेले ग्लॅमरस फोटो पहा एका क्लिकवर

By तेजल गावडे | Published: October 10, 2020 04:14 PM2020-10-10T16:14:51+5:302020-10-10T16:25:31+5:30

तारूण्यातील रेखा यांचे ग्लॅमरस फोटो पाहून विसराल आताच्या टॉपच्या अभिनेत्रींना

उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.

रेखा यांनी फक्त त्यांच्या काळातच नाही तर आताही त्यांच्या स्टाईल व सौंदर्यानं सर्वांना भुरळ पाडली आहे.

रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.

रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती.

त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.

त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.

रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री असून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात.

त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते. या वयातही त्या एकट्या राहतात. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल ट्रोल केलं जातं. तरीदेखील त्या बिन्धास्त आहेत.

वयाच्या ६६ व्या वर्षीदेखील रेखा यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं ही कमालीची बाब आहे.

रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे.

रेखा सध्या चित्रपटात पहायला मिळत नसल्या तरी त्या टेलिव्हिजनवरील शोज व पुरस्कार वितरण कार्यक्रमात नेहमी पहायला मिळतात.

टॅग्स :रेखाRekha