टाइगर श्रॉफसह एअरपोर्टवर दिसली दिशा पाटनी, दोघांनीही दिल्या पोजवर पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 06:00 AM2020-12-28T06:00:00+5:302020-12-28T06:00:00+5:30

दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे.

दिशा पाटनी आणि टाइगर श्रॉफ दोघेही एकत्र एअरपोर्ट दिसले.यावेळी दोघांचाही एअरपोर्ट लूकने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

दोघांनी परिधान केलेले कपडेसुद्धा एकमेकांना मॅच करत होते. दोघेही यावेळी ट्विनिंग मोडमध्ये दिसले.

ब्रेकअपच्या बातम्यानंतर बर्थ डे पार्टी, व्हॅकेशन टूरदरम्यान दोघांनाही एकत्र पाहिले गेले होते.

दोघांमधला आलेला दुरावा मिटल्याचे त्यांच्या या फोटोंवरुन पाहयला मिळतंय.

आजपर्यंत दोघांनाही कधीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.

दोघांचे सतत एकत्र दिसणे यामुळे त्यांचे चाहत्यांना मैत्रीपलिकडेही नाते असल्याचे तर्क वितर्क लावतात.

टायगर आणि दिशा ही जोडी रसिकांच्या नेहमीच पसंतीस पात्र ठरते.

नुकतेच दोघांनीही एकत्र दुबईत एका कार्यक्रम सोहळ्यात हजेरी लावली होती.

दोघांनीही 'बागी २' आणि 'बागी ३' मध्ये एकत्र काम केले होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली होती.