IN PICS : शाहरुख खानसारखी पोज देताना हिमाचलमध्ये दिसली रवीना टंडन, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 07:00 AM2020-12-15T07:00:00+5:302020-12-15T07:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिचे व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये रवीना टंडन बर्फाच्या डोंगरावर अभिनेता शाहरुख खानसारखी पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

सध्या रवीना टंडन तिचा आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी हिमाचलमध्ये आहे. (Photo Instagram)

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने स्वित्झर्लंडमधील शूटिंगदरम्यान अशाच पोज दिल्या होत्या. (Photo Instagram)

फोटो पोस्ट करताना रवीना टंडनने कॅप्शनमध्ये #Switzerlandkasharukh हॅशटॅग दिला आहे. (Photo Instagram)

रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर 4.9 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

रवीना टंडनचा पदार्पणाचा चित्रपट पत्थर के फूल सुपरहिट ठरला होता. ज्यासाठी तिला नवोदित कलाकाराचा फिल्मफेअरचा पुरस्कारही देण्यात आला होता. (Photo Instagram)

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. (Photo Instagram)