PICS : रणवीर सिंगचा हा अतरंगी अवतार पाहून कोरोना व्हायरसही पळून जाईल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:30 AM2021-01-13T11:30:34+5:302021-01-13T11:38:18+5:30

सतरंगी, अतरंगी...

रणवीर सिंग बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक हिरो आहे, यात वाद नाही. मात्र त्याची अंतरंगी स्टाईल म्हणजे, कळस आहे. होय, आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे, स्टाईलमुळे रणवीर सतत चर्चेत असतो.

सध्याही रणवीरचा एक अतरंगी लूक चर्चेत आहे. नुकताच रणवीर काम संपवून एका ठिकाणावरून बाहेर पडला. पण त्याचा लूक असा की, कोणीच त्याला ओळखू शकले नाही. कदाचित त्याचा अतरंगी लूक पाहून कोरोना व्हायरसही आपला मार्ग बदलला असावा.

रणवीरने यावेळी एक डिझाईनर मास्क घातला होता. ब्लॅक कलरचा हा डिझाईनर मास्क, सोबत निळ्या रंगाचा गॉगल आणि निळ्याच रंगाचा हुडी ट्रॅकसूट असा त्याचा अवतार होता.

रणवीर अनेकदा अशा अतरंगी अवतारात दिसतो. यावरून अनेकदा तो ट्रोलही होतो. पण रणवीरने कधीच याची पर्वा केली नाही.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो

कधी विविध रंगाच्या टोप्या, हटके गॉगल्स, शूज, रंगीबेरंगी कपडे अशा सगळ्या अवतारामुळे रणवीर सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो

रणवीरचे आउटफिट्स नेहमीच वेगळे असतात. परंतु, अनेकदा त्याला आपल्या कपड्यांच्या फॅशनमुळे ट्रोल व्हावे लागले आहे.

ब-याचदा रणवीर सिंगच्या विचित्र स्टाइलमुळे सोशल मीडियावर त्याची खिल्लीही उडवली जाते.

मस्तमौला रणवीर त्याला आवडेल तेच करतो. रणवीर कुठलीही स्टाईल कॅरी करायला मागे पुढे पाहत नाही.