पाहा, रणदीप हुड्डाची ‘दुल्हनिया’, हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:15 PM2020-03-04T14:15:01+5:302020-03-04T14:30:25+5:30

कोण आहे रणदीपची गर्लफ्रेन्ड , पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा एका मणिपुरी मॉडेलच्या प्रेमात पडलाय. होय, या मॉडेलसोबत रणदीप लवकरच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

2016 पासून रणदीप एका मणिपुरी मॉडेलला डेट करतोय. या मॉडेलचे नाव आहे लिन लॅशराम.

चार वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या कपलने आता लग्नाचा निर्णय घेतल्याचे कळतेय.

2018 मध्ये नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये रणदीप व लिन यांना पहिल्यांदा एकत्र पाहिले गेले होते. यानंतर दोघांच्या लव्हलाईफच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

लवकरच रणदीप लिनला आपल्या कुटुंबीयांशी भेटवणार आहे.

रणदीपची बहीण अंजली आधीच लिनला भेटली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रणदीप गुड न्यूज देणार असे मानले जात आहे.

रणदीपची गर्लफे्रन्ड लिन ही मणिपुरी अभिनेत्री आहे.

2014 मध्ये एका बॉलिवूड सिनेमातही ती झळकली होती.

प्रियंका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या सिनेमात तिने काम केले होते. याशिवाय लिन ही नॅशनल लेव्हल आर्चरही आहे.

नशीरूद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रूपमध्ये तिने अनेक वर्षे काम केले.