बाहुबलीचा 'भल्लालदेव'चे हनीमून फोटो आले समोर, या ठिकाणी करतोय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:11 PM2020-10-19T12:11:29+5:302020-10-19T12:22:38+5:30

बाहुबलीचा भल्लालदेव, म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबातीने यावर्षी ऑगस्टमध्ये मिहिका बजाजशी लग्न केले. दोघेही त्यांच्या लग्नामुळे जबरदस्त चर्चेत राहिले.त्यांच्या लग्नाचेही फोटो तुफान व्हायरल झाले होते.

आता लग्नानच्या दोन महिन्यांनतर दोघे हनीमून एन्जॉय करतायेत.खुद्दमिहिकानेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कोरोना काळातच मिहिका आणि राणाचं हैदराबादमध्ये धुमधडाक्यात लग्न झालं होतं.

तेलुुगु आणि मारवाडी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांनी कधीच त्यांचे नाते जाहीर केले नव्हते.

तसेच सोशल मीडियावरही कधीच एकत्र फोटो शेअर करत नव्हते.

लग्न ठरल्यानंतरच दोघांनीही एकमेंकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली.

दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

अभिनेत्री सोनम कपूर ही मिहिकाची जवळची मैत्रीण आहे. मिहिकाने सोनमच्या लग्नालाही हजेरी लावली होती. शिवाय ती सोनमसोबतचे फोटोही शेअर करत असते.

मीहिका हैदराबादची असून इंटेरियर डिझायनर आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही चालवते. तिने मुंबई आणि लंडनमधून शिक्षण घेतले आहे.

Read in English