प्रियंका, मल्लिका ते दीपिकापर्यंत...! विदेशी रेड कार्पेटवर फॅशनची ऐसीतैसी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:47 PM2021-01-31T17:47:59+5:302021-01-31T18:00:48+5:30

2019 साली मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राला पाहून सगळेच थक्क झाले होते.

बॉलिवूडच्या अनेक ललना वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल व अवार्ड शोमध्ये वावरताना दिसतात. सोहळा देशातील असो की विदेशातील या ललनांचा जलवा पाहण्यासारखा असतो. पण अनेकदा रेड कार्पेटलूकमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रोलही व्हावे लागते. विदेशात रेड कार्पेट लूकमुळे टीका सहन करावा लागलेल्या अभिनेत्रींबद्दल आम्ही आज सांगणार आहोत.

2003 साली कान्स सोहळ्यात ऐश्वर्या राय साडी नेसून रेड कार्पेटवर उतरली होती. तिचा लूक इतका मामुली होता की, सगळेच हैराण झाले होते.

रेड कार्पेट लूकमुळे ट्रोल व्हाव्या लागलेल्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियंका चोप्राचे नाव घ्यावेच लागेल. 2009 साली टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियंकाचा रेड लूक पाहून सगळेच हैराण झाले होते. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी नेसून ती या रेड कार्पेटवर उतरली होती. तेव्हा अनेकांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली होती.

2019 साली मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राला पाहून सगळेच थक्क झाले होते. या लूकमुळे ती बºयाच दिवस ट्रोल झाली होती.

2009 साली लंडन येथे झालेल्या फिल्म प्रीमिअरमध्ये दीपिका पादुकोण ज्या अवतारात रेड कार्पेटवर उतरली होती, ते पाहून सगळच हैराण झाले होते. ही दीपिकाच काय, असा प्रश्न तिचा लूक पाहून अनेकांना पडला होता.

सोनम कपूर म्हणायला बॉलिवूडची फॅशनिस्टा आहे. पण 2011 साली कान्स फेस्टिवलमध्ये तिचे फॅशनची पार वाट लावली होती. बेकार मेकअप आणि हेअरस्टाईलमुळे ती ट्रोल झाली होती.

2005 साली कान्स सोहळ्यात मल्लिका शेरावतने कपड्यांपेक्षा शरीरप्रदर्शन केले होते. तिच्या या लूकची खिल्ली उडवली गेली होती.

2008 सालच्या कान्स सोहळ्यातीही ऐश्वर्याचा लूक वाईट नव्हता. पण इतक्या मोठ्या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर तिचा हा लूक पाहून अनेकांनी नाके मुरडली होती.

Read in English