PICS : प्रियंका चोप्राचे हटके फोटोशूट; बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:00 AM2021-01-13T08:00:00+5:302021-01-13T08:00:02+5:30

या लूकवर चाहते फिदा...

प्रियंका चोप्रा सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

प्रियंकाच्या या फोटोशूटची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आहे.

या फोटोत प्रियंका हटके लूकमध्ये दिसतेय. तिच्या या हटके लूकवर चाहते फिदा आहेत.

पीसीने वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलेय. तिची हेअरस्टाईलही खास आहे.

प्रियंकाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वीही अनेकदा प्रियंकाने तिच्या लूकसोबत अनेक एक्सपेरिमेंट्स केलेत. हे नवे फोटोही तसेच.

प्रियांका सध्या अमेरिकेत राहत असून वेगवेगळ्या हॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत आहे.

अनेक सिनेमांचे शूटींग तिने पूर्णही केले आहे. तसेच तिचे पुस्तकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यात तिने तिच्या जीवनातील काही खास पैलू उलगडले आहेत.

लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.