पॉवर कपल प्रियांका-निक आहेत कोट्यधीश; Networth पाहून होतील डोळे पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:16 AM2021-11-25T11:16:26+5:302021-11-25T11:24:00+5:30

Priyanka chopra: Quantico च्या एका भागासाठी प्रियांकाने ३ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. प्रियांका अभिनेत्री असण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे.

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी एक वक्तव्य करुन सगळ्यांना बुचकळ्यात टाकलं होतं. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

२०१८ साली प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून निक आणि प्रियांका ही जोडी कायम त्यांच्या कपल गोल्समुळे चर्चेत असते.

निक आणि प्रियांका दोघेही त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी असून दोघंही अमाप संपत्तीचे मालिक आहे. त्यामुळेच या दोघांचं Networth म्हणजेच एकूण संपत्ती किती हे पाहुयात.

GQ Magazine च्या रिपोर्टनुसार, प्रियांका आणि निक यांचं एकूण Networth 734 कोटी रुपये इतकी आहे.

निक आणि प्रियांकाचं ब्रँड व्हॅल्यू जास्त असून त्यातून त्यांची सर्वाधिक कमाई होत असल्याचं सांगण्यात येतं. प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही कलाविश्वांमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तिच्या कमाईची आकडेवारीदेखील तशीच आहे.

प्रियांका सध्या हॉलिवूडमध्येही कार्यरत असल्यामुळे बॉलिवूडमधूनही तिला मोठ्या रक्कमेच्या ऑफर्स मिळतात.

चित्रपटांव्यतिरिक्त प्रियांका ब्रँड एंडोर्समेंट, सीरिज यांच्या माध्यमातून कमाई करते. तसंच न्यूयॉर्कमध्ये तिचं रेस्टॉरंटदेखील आहे. इतकंच नाही तर प्रियांका एक स्टेज परफॉर्मेन्स करण्यासाठी साधारणपणे ४-५ कोटी रुपये मानधन घेतल असल्याचं सांगण्यात येतं.

Quantico च्या एका भागासाठी प्रियांकाने ३ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. प्रियांका अभिनेत्री असण्यासोबतच एक निर्मातीदेखील आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या तिच्या कंपनीअंतर्गत तिने अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत.

प्रियांका एका इन्स्टाग्राम स्पॉन्सर्ड पोस्टसाठी १.८० कोटी रुपये आकारते. त्यामुळे तिची जवळपास कमाई $2,71,000 असल्याचं सांगण्यात येतं.

प्रियांकाप्रमाणेच निकदेखील कोट्यवधींचा मालक आहे. जोनस ब्रदर्स या त्यांच्या ब्रँड ग्रुपसोबत त्याने करिअरची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याने संगीत क्षेत्रात खऱ्या अर्थाने काम करण्यास सुरुवात केली. निक गायक असण्यासोबतच अभिनेतादेखील आहे.

निक जोनास टकीला ब्रँड Villa One चा को-ओनर आहे. तसंच Celebrity Net Worth च्या माहितीनुसार, निकची एकूण नेटवर्थ $50 मिलियन इतकं आहे. लग्नानंतर प्रियांका लॉस एन्जलिसमध्ये स्थायिक झाली असून तिचं जवळपास १४४ कोटी रुपयांचं घर आहे. हे घर २० हजार स्क्वेअर फीटमध्ये उभं आहे.

प्रियांकाला गाड्यांची विशेष आवड आहे. तिच्याकडे Mercedes-Benz Maybach अशा अनेक गाड्या आहेत.

निक-प्रियांकाच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये BMW 5 Series, Mercedes S-Class, Audi Q7, 1960 Ford Thunderbird, 1968 Ford Mustang, Chevrolet Camaro, Karma Fisker और Dodge Challenger R/T या गाड्यांचा समावेश आहे.

Read in English