Priyanka Chopra & Nick Jonas: दुरावा, घटस्फोट नाही तर या कारणामुळे प्रियंका चोप्राने आपल्या नावातून हटवलं निक जोनासचं आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:20 PM2021-11-24T17:20:09+5:302021-11-24T17:25:47+5:30

Priyanka Chopra & Nick Jonas: प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं वृत्त आल्यानंतर प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. दरम्यान, निक जोनासवर एवढं प्रेम करणाऱ्या प्रियंकाने तिच्या नावामधून निक जोनासचं आडनाव का काढलं याचं कारण समोर आलं आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने तिच्या नावामधून पती निक जोनास याचे आडनाव हटवल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या तसेच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं वृत्त आल्यानंतर प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. दरम्यान, निक जोनासवर एवढं प्रेम करणाऱ्या प्रियंकाने तिच्या नावामधून निक जोनासचं आडनाव का काढलं याचं कारण समोर आलं आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार प्रियंकाने तिचे दोन दीर केविन जोनास आणि जो जोनास यांच्यामुळे आपल्या नावामधून जोनास हे आडनाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार प्रियंका चोप्राने हे पाऊल जोनास ब्रदर्सच्या रोस्ट शो 'Jonas Brothers Family Roast' चे प्रमोशन करण्यासाठी उचलले आहे. हा रोस्ट बेस्ड शो मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झाला आङे. मात्र याबाबत आतापर्यंत प्रियंकाने मौन बाळगलं आहे.

'Jonas Brothers Family Roast' शो मध्ये जोनास ब्रदर्सना त्यांच्या पार्टनर्सने जॉईन केले होते. यादरम्यान प्रियंकानेही पती निक याला रोस्ट केले.

निक जोनास रोस्टच्या एका भागात प्रियंकाने सांगितले की, निकच्या मोठ्या मोठ्या भावाची ३ मुले आहेत. केविन जोनासला दोन मुली आहेत तर जो जोनासला एक मुलगी आहे. कुटुंबात आम्हीच असं जोडपं आहोत, ज्यांना एकही मूल नाही. त्यामुळे मी इथे घोषणा करते की, निक आणि मी एक्स्पेक्ट करत आहोत... मग काही सेकंद थांबत प्रियंका म्हणाली की आज रात्री ड्रंक होण्यासाठी आणि उद्या झोपण्यासाठी...

प्रियंका चोप्राने शोदरम्यान, निक आणि तिच्यामधील वयातील अंतरामधूनही तिने निकला रोस्ट केले. प्रियंका म्हणाली की, निक आणि माझ्यामध्ये १० वर्षांचे अंतर आहे आणि ९० च्या दशकातील अनेक पॉप कल्चर रेफरन्स आहेत जे त्याला समजत नाहीत. ते त्याला समजवावे लागतात. कारण आम्ही एकमेकांना काही गोष्टी शिकवतो. त्याने मला टिक टॉक चालवायला शिकवले. तर मी त्याला अभिनयामध्ये यशस्वी कारकीर्द कशी करायची हे दाखवून दिले.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. टीव्ही होस्ट जिमी फेलॉन याने आपल्या शोमध्ये प्रियंकाला विचारले होते की, तिने तिच्या नावामध्ये निकचे नाव का जोडले. त्यावर प्रियंका म्हणाली होती की, मी नेहमीच त्याचे नाव आपल्या नावाशी जोडू इच्छीत होते.

प्रियंकाने सांगितले की, मी असे यासाठी केले कारण ते मला आवडते. आम्ही एक कुटुंब आहोत, असे जाणवते. मी पारंपरिक विचारांची व्यक्ती आहे. तसेच माझे काही विचार जुने आहेत. मात्र याचा अर्थ मी माझी ओळख सोडत आहे, अशा होत नाही.