म्हणून करावे लागले प्रियंकाला निक जोनास सोबत लग्न, कारणही आहे खासच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:27 AM2020-11-10T11:27:19+5:302020-11-10T11:34:21+5:30

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि पॉप गायक निक जोनास लग्नानंतर ट्रेडिंग कपल बनले आहेत. त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ही चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो. या दोघांच्या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंकाने निक जोनासबाबतसह लग्न केल्याचे कारण सांगितले आहे.

मुलाखतीत प्रियंकाने सांगितले की, एक वेळ अशी होती की, माझ्या लग्नाचा विषय निघताच मी अस्वस्थ व्हायची.

लग्नाबद्दल माझ्या मनात खूप शंका होत्या. लग्नाबाबत विचार करताना मला alien thought वाटायचे.

पण जेव्हा निक जोनासला भेटली तेव्हा त्याच्या बद्दल खूप सुंदर नाते निर्माण झाले आणि लग्नानंतर लग्नाविषयी जे नकारात्मक विचार होते तेही बदलले आणि सकारात्मक विचार करायला लागली.

लग्नानंतर प्रियंकाचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नसले तरीही, दोघेही त्यांची वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.

नुकतेच प्रियंकाने करवा चौथचे सेलिब्रेशन केले. निक जोनाससाठी तिने परदेशात उपवास केला होता.

सेलिब्रेशनचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

या फोटोंना पाहून चाहत्यांनीही प्रचंड लाईक्स आणि कमेंटस करत कौतुक केले होते.

दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.

प्रियंका आणि निक दोघेही क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

लग्नानंतर प्रियंकाचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नसले तरीही, दोघेही त्यांची वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.