In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:02 PM2020-09-04T13:02:12+5:302020-09-04T13:15:59+5:30

जितके जास्त फॉलोअर्स, तितकी जास्त लोकप्रियता... अशात सोशल मीडियावर स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत, यावर एक नजर...

किम कार्दाशियन - हॉलिवूडची लोकप्रिय टीव्ही पर्सनॅलिटी व मॉडेल किम कार्दाशियन हिचे इन्स्टाग्रामवर कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. पण यापैकी 44 टक्के फॉलोअर्स फेक आहेत, हे जाणून तुम्हाला धक्का बसेल.

एलेन डिजेनेरेस - Institute of Contemporary Music Performance (ICMP) नुसार अमेरिकन कॉमेडियन व टीव्ही होस्ट एलेन डिजेनेरेसचे 58 टक्के फॉलोअर्स फेक आहेत.

बियॉन्ड द सोल - दुस-या क्रमांकावर फेक फॉलोअर्स असलेले सेलेब्रिटी आहेत कोरियन बॉय बँड BTSचे कलाकार. BTSचे 48 टक्के इन्स्टा फॉलोअर्स फेक आहेत.

कॉर्टनी कर्दाशियन - कॉर्टनी कर्दाशियन तिस-या क्रमांकावर आहे. तिचे 49 टक्के फॉलोअर्स फेक आहेत.

क्लो कार्दाशियन - क्लो कार्दाशियनच्या अकाउंटवरही 44 टक्के फेक चाहते आहेत.

मिली सायरस - फेमस अमेरिकन सिंगर मिली सायरसच्या इन्टा अकाउंटवरसुद्धा प्रचंड प्रमाणात फेक फॉलोअर्स आहेत.

केटी पेरी - अमेरिकन सिंगर व सॉन्ग राइटर केटी पेरीच्या इन्टा अकाउंटवर 53 टक्के फेक फॉलोअर्स आहेत.

एरियाना ग्रांडे -एरियाना ग्रांडे हिचेही 46 टक्के फॉलोअर्स फेक आहेत़

टेलर स्विफ्ट - अमेरिकन सिंगर टेलर स्विफ्टचे 46 टक्के फॉलोअर्स फेक आहेत.

प्रियंका चोप्रा -फेक फॉलोअर्सच्या यादीत प्रियंका चोप्रा 10 व्या स्थआनावर आहे. 46 टक्के फॉलोअर्स खोटे आहेत.

दीपिका पादुकोण -बॉलिवूड सेलेब्रिटी दीपिका पादुकोण या जागतिक यादीत सहाव्या नंबरवर आहे. दीपिकाचेही 48 टक्के फॉलोअर्स खरे नाहीत, हे सांगून खरं वाटणार नाही.

Read in English