PHOTOS : 20 वर्षांत इतकी बदली 'मोहब्बते' अभिनेत्री प्रिती झंगियानी, पाहा तिचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 07:00 AM2020-12-06T07:00:00+5:302020-12-06T07:00:03+5:30

'मोहब्बते' सिनेमानंतर प्रिती झंगियानी हा चेहरा घराघरात पोहोचला. (Photo Instagram)

बऱ्याच काळापासून प्रिती झंगियानी सिनेमा जगतापासून दूर आहे पण सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

2000 साली रिलीज झालेल्या 'मोहब्बतें' सिनेमानंतर अभिनेत्री प्रीती झांगियिनी रातोरात स्टार झाली. (Photo Instagram)

प्रितीचा जन्म मुंबईतल्या एका सिंधी कुटुंबात झाला. सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ‘ये है प्रेम’ मध्ये ती झळकली. त्यानंतर ‘छुई मुई सी तुम लगती हो’ आणि ‘कुड़ी जच गई’ या गाण्यात ती दिसली. या गाण्यांमुळे प्रितीला कमालीची लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

मॉडेल व अ‍ॅक्टर प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली. प्रितीचा पती प्रवीण अभिनेताव्यतिरीक्त स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. (Photo Instagram)

प्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे. (Photo Instagram)

‘मोहब्बतें’नंतर एलओसी, आन, अनर्थ या चित्रपटात ती दिसली होती. (Photo Instagram)