अखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली

By प्रविण मरगळे | Published: January 11, 2021 05:15 PM2021-01-11T17:15:32+5:302021-01-11T17:19:05+5:30

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी वर्षाची सुरूवात अत्यंत आनंदाने झाली आहे. विराट कोहली(Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा(Anushka Sharma) यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जोडी माध्यमात चर्चेत होती.

कॅप्टन विराट कोहलीने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की, आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, मी आणि अनुष्का आज दुपारी एका मुलीचे आई-वडील बनलो आहे, आम्ही तुमच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत.

अनुष्का आणि मुलगी दोघंही सुखरूप आहेत, आम्ही आमच्या जीवनातील या नव्या अध्यायाच्या सुरूवातीसाठी आनंदीत आहोत, आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट.

अलीकडेच ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरूजी यांनी भविष्यवाणी केली होती की, विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकलीचा जन्म होणार आहे, आणि जगन्नाथ गुरूजींची ही भविष्यवाणी खरी ठरल्याने सध्या ज्योतिषी सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहेत.

पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, अनुष्का आणि विराटला एक गोंडस मुलगी होणार आहे. या चिमुकलीमुळे त्यांचे जीवन पूर्ण बदलणार आहे. त्यांच्या मुलीच्या आगमनाने आयुष्यात प्रचंड आनंद निर्माण होणार आहे. ही मुलगी तिच्या वडिलांसाठी भाग्यवान असेल असे देखील त्यांनी सांगितले होते. विराट आणि अनुष्का यांच्या चेहऱ्याचे वाचन करून त्यांनी ही भविष्यवाणी केली होती.

एक अनोखा योगायोग असा की, जेवढे महान क्रिकेटर आहेत, त्यांच्या घरी पहिल्यांदा मुलीनेच जन्म घेतला आहे. सर डॉन ब्रेडमॅन सोडले तर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंगसारख्या अनेक महान क्रिकेटपटूंच्या घरी आधी मुलीने जन्म घेतला आहे.

विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पुन्हा भारतात परतला होता, विराट कोहलीने अनुष्काच्या बाळंतपणात पॅटरनिटी रजा घेतली आहे. २७ ऑगस्टला विराटने ट्विट करत सांगितले होते की, जानेवारी २०२१ मध्ये आम्ही आई-वडील होऊ, अखेर आज तो दिवस आला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.

या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ साली दोघांनी इटलीत लग्न केले. काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खासगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का भडकली होती.

तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.

Read in English