एक व्हिलनच्या शूटिंगदरम्यान मान्य केली नाही निर्मात्यांची अट, Prachi Desai ने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला करुन घेतले होते बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:59 AM2021-04-23T10:59:32+5:302021-04-23T11:06:52+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र चित्रपटसृष्टीतून कधी गायब होतात तेही कळत नाही. अशात अभिनेत्री प्राची देसाईदेखील गणली जाते.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री प्राची देसाई हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.

2006 मध्ये टीव्ही सीरियल ‘कसम से’ मधून मनोरंजन विश्वात डेब्यू केलेल्या प्राची देसाईने 2008 मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटाद्वारे फरहान अख्तरसह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम देखील केले आहे. मात्र, 2015नंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वातून गायब झाली.

अनेकदा बॉलिवूडमध्ये असलेल्या कास्टिंग काऊचला बळी पडल्याचे तिने मुलाखतीत सांगितले आहे.नेपोटीझमचा फटकाही प्राचीला बसला. अशा अनेक कारणांमुळे प्राची आज सिनेसृष्टीपासून लांब आहे.

अनेकदा बॉलिवूडमध्ये असलेल्या कास्टिंग काऊचला बळी पडल्याचे तिने मुलाखतीत सांगितले आहे.नेपोटीझमचा फटकाही प्राचीला बसला. अशा अनेक कारणांमुळे प्राची आज सिनेसृष्टीपासून लांब आहे.

यापैकी तिचा आणखी एक किस्सा सध्या चर्चेत आहे. नुकताच एका मुलाखतीत तिने तिच्या भयानक अनुभवाविषयी सांगितले आहे. एक व्हिलन सिनेमावेळी आयटम साँगच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा आहे.

'आवारी हैं' या आटम साँगचे शूटिंग करण्यात येत होते. त्यावेळी तिला नेमके काय करावे लागणार आहे याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. अशावेळी ब्रेस्टमध्ये सिलिकॉन पॅड वापरण्यास तिला सांगण्यात आले हे ऐकताच ती प्राचीने ही गोष्ट करण्यास नकार दिला.

प्राचीने डिपनेक ब्लाउज आणि स्कर्ट परिधान केला होता. त्यात ब्रेस्टमध्ये सिलीकॉन पॅड वापरण्यास तिने नकार दिला. त्याचेवळी शूटिंग थांबवत तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्वतःला बंद करुन घेतले होते.

प्राचीची समजूत घालण्यासाठी निर्माती एकता कपूरला मध्यस्ती करावी लागली, एकताने प्राचीला समजवल्यानंतरच प्राची पुन्हा गाण्याच्या शूटसाठी तयार झाली होती. त्यानंतर रखडलेल्या गाण्याचे शूट पूर्ण करण्यात आले होते.

बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचा सामना केल्याचे सांगितले. एक मोठा चित्रपट करण्यासाठी आपल्याला देखील तडजोड करण्यास सांगण्यात आल्याचे तिने यावेळी सांगितले होते.

'सायलेन्स कॅन यू हियर इट' या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे प्राची पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत झळकली आहे. सिनेमात झळकत नसली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता ती रसिकांचे मनोरंजन करत राहणार हे मात्र नक्की.

Read in English