प्रभुदेवाच्या EX गर्लफ्रेंडचा झाला साखरपुडा, समोर आले रोमँटीक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 05:13 PM2021-03-26T17:13:56+5:302021-03-26T17:25:47+5:30

Nayanthara flaunts ring in pic : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नयनतारा नाव चांगलंच हिट आहे, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला आहे.

प्रभुदेवासह असलेल्या प्रेमप्रकरणानंतर ती अधिकच चर्चेत आली होती. प्रभुदेवा विवाहीत असतानाच तिच्यासह अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या.

नयनतारासाठी प्रभु देवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला होता.

जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभूदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपासून नयनतारा विग्नेश शिवनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अखेर विग्नेशसह नयनातराने साखरपुडा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'नानुम राऊडी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नयनतारा आणि विग्नेश यांची मैत्री झाली होती.

या नतंर त्यांची मैत्रींचे रुपांतर प्रेमात झाले आणि तिथूनच दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती.

दोघांचे सतत एकत्र फिरणं, सोशल मीडियावर फोट शेअर करणे यावरुन दोघांचे प्रेमप्रकरण सुरु असल्याचे बोलले गेले होते.

यावर नयनताराने कोणत्याही प्रकारची कबुली दिली नव्हती. मात्र फोटोच त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली देत होते.