पूनम पांडेचे बॉयफ्रेन्डसोबत ‘सीक्रेट वेडिंग’, शेअर केलेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:46 PM2020-09-11T12:46:14+5:302020-09-11T12:58:39+5:30

पाहा फोटो...

आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेने बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली.

या सीक्रेट लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. यात दोघेही वर-वधूच्या पोशाखात दिसत आहेत.

पूनम व सॅमने नुकताच गुपचुप साखरपुडा उरकला होता.

साखरपुड्याचा फोटो पोस्ट करून पूनमने सॅमसोबतचे नाते चाहत्यांसमोर मान्य केले होते.

बॉलिवूडच्या अत्यंत हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून पूनम पांडेला आपण ओळखतो. तिच्या हॉट अंदाजातील अदा पाहून चाहते अक्षरश: घायाळ होतात.

पूनम ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती तिचे हॉट व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सॅम आणि पूनम यांना लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केल्याची बातमी आली होती. मात्र,या वृत्ताचे खंडन करत, मी घरीच चित्रपट बघत वेळ घालवत असल्याचे पूनमने सांगितले होते.

पूनमने मॉडेलिंग क्षेत्रातून करिअरची सुरूवात केली होती. 2013 साली नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

जवळपास पाच चित्रपट आणि काही मालिकेत पूनमने काम केले आहे.

पूनम पांडे 2011 साली क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान चर्चेत आली होती. जेव्हा तिने भारतीय संघ जिंकल्यावर न्यूड होणार असल्याचे सांगितले होत.

Read in English