PICS : पाहा, तापसी पन्नूचे ड्रिम होम, युरोपियन कॅफेच्या थीमवर सजवलाय प्रत्येक कोपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:37 PM2020-12-16T14:37:26+5:302020-12-16T15:01:13+5:30

तापसीचे घर आतून कसे दिसते? एक झलक ...

थप्पड, बदला, पिंक, मनमर्जिया अशा अनेक हिट सिनेमात काम करणारी अभिनेत्री तापसी पन्नूने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पण आज आम्ही तापसीच्या करिअरबद्दल नाही तर तिच्या घराबद्दल सांगणार आहोत.

मुंबईत हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. तापसीचे हे स्वप्न कधीच पूर्ण झालेय.

मुंबईच्या अंधेरी भागात तापसीने एक 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला. तापसीचे घर आतून कसे दिसते, त्याची एक छोटीशी झलक इथे आम्ही दाखवणार आहोत.

2018 मध्ये तापसी या नव्या घरात शिफ्ट झाली होती.

तापसी तिच्या बहिणीसोबत या घरात राहते. तापसीच्या बहिणीनेच या घराचा कोपरा अन् कोपरा सजवलाय.

युरोपियन कॅफेच्या डिझाईनवरून प्रेरणा घेत तिने हे घर सजवले आहे.

तापसीच्या घरातील प्रत्येक वस्तू लक्ष वेधून घेते. पांढ-या भींतीवरची ही मोठ्ठी घड्याळ बघताक्षणी डोळ्यांत भरते.

बाल्कनीतील झोपाळा, हिरवीगार रोपटी आणि पेन्टिंग्स मनात भरतात.

डायनिंग रूममधील वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या, टी-मेकर आणि क्रॉकरी सगळे काही युनिक आहे.

मागच्या वर्षभरात तापसीचे एक-दोन नाही तर 5 सिनेमा रिलीज झालेत आणि यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली

तापसी एक उत्तम अभिनेत्री आहे़ वेगवेगळ्या धाटणीचे, प्रयोगशील चित्रपट ही तिची खास ओळख. गेल्या वर्षीही तिने अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेत. झूम टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तापसीच्या गतवर्षीच्या सर्व सिनेमांनी मिळून एकूण 352 कोटी रुपयांची कमाई केली आहे.