पापा की परी ! दीपिका पादुकोणचे फॅमिली फोटो होतायेत व्हायरल, शेवटचा फोटो आहे सगळ्यांत खास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:16 PM2020-09-24T15:16:55+5:302020-09-24T15:35:05+5:30

बापलेकीचं नातं हे वेगळं असतं. प्रत्येक पित्याचा आपल्या लेकीवर जीव असतो आणि लेकीचंही वडिलांवर तितकंच प्रेम होतं. बॉलीवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांचंही असंच काहीसं नातं आहे.

सतत कामात बिझी असलेली दीपिकाला जेव्हा कधी वेळ मिळतो तिच्या कुटुंबियांसोबत ती क्वॉलिटी टाईम घालवते.

बॉलिवूडमधील इव्हेंट, पुरस्कार सोहळ्यांमध्ये कुटुंबासह दीपिकाची हजेरी लावते.

कामातून वेळ काढत कुटुंबासोबत पुजा करतानाही दीपिकाचे फोटो समोर आले होते.

लग्नानंतर अशा प्रकारे सासरच्या मंडळींसह दीपिकाने मीडीयाच्या कॅमेर-यांना दिल्या होत्या पोज.

दीपिकाचे बालपणीचे फोटोनाही चाहते भरभरून प्रतिसाद देतात.आमिर खान असलेल्या हा फोटोही इंटनेटवर लक्षवेधी ठरतो.

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची लेक असलेल्या दीपिकाला वडिलांचं नाव उंचावण्याची इच्छा आहे.

वडील प्रकाश पादुकोण त्यांच्यावर बायोपिक काढण्यात यावा असेही तिने सांगितले होते.

दीपिका पादुकोण आणि तिचे वडील प्रकाश पादुकोण यांच्या फोटोत बापलेकीचं नातं पाहून चाहत्यांनाही वाटते कौतुक

वडिलांप्रमाणे ती बॅडमिंटन खेळत नसली तरी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत दीपिका आघाडीची नायिका बनली आहे.

दीपिकासह लग्न केल्यानंतर रणवीर सिंहचे पालटले आयुष्य, स्वतःला समजत लकी चार्म

Read in English