'कोटा फॅक्ट्री'चा जीतू भैय्या आहे करोडोपती; पाहा अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याचं नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:43 PM2022-05-12T17:43:34+5:302022-05-12T17:47:36+5:30

Jitendra kumar : जितेंद्रने कोटा फॅक्ट्रीमधून अभिनयाची सुरुवात केली. यात त्याने जीतू भैय्या ही भूमिका साकारली होती.

कॉमेडी ड्रामा बेवसीरिज पंचायतचा दुसरा सीजन लवकर म्हणजे येत्या २० मे रोजी अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. त्यामुळे शा सीरिजची सोशल मीडियावर चर्चा आहे.

पंचायत मध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, रघुवीर यादव आणि नीना गुप्ता हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

या सीरिजमध्ये इंजिनिअरिंग झालेल्या अभिषेक या मुलाभोवती फिरते. जो उत्तर प्रदेशमधील फुलेरा गावात पंचायत सचिव असतो. या सीरिजच्या पहिल्या भागात अभिनेता जितेंद्र कुमार याने ही भूमिका साकारली आहे. जो नोकरीसाठी संघर्ष करत असतो. तर, दुसऱ्या सीजनमध्ये त्याची लव्ह लाइफ दाखवली जाणार आहे.

विशेष म्हणजे पहिल्या सीजनपासूनच लोकप्रिय झालेल्या जितेंद्र कुमारचा आज बऱ्यापैकी चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात.

जितेंद्र कुमार मूळचा राजस्थानमधील अलवर येथील खैरथलमध्ये राहणारा आहे. त्याने आयआयटी खडगपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

इंजिनिअर झाल्यानंतर जितेंद्र कुमारने त्याची आवड असलेल्या अभिनय क्षेत्राकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली.

जितेंद्रने कोटा फॅक्ट्रीमधून अभिनयाची सुरुवात केली. यात त्याने जीतू भैय्या ही भूमिका साकारली होती.

मेहनत आणि संघर्ष यांच्या जोरावर जितेंद्र कुमारने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं आहे. सीरिज व्यतिरिक्त तो अनेक जाहिरातींमध्येही झळकला आहे.

जितेंद्र एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये चार्ज करत. त्यामुळे एका सीरिजसाठी तो लाखो रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.

जितेंद्र शुभ मंगल ज्यादा सावधानमध्येही झळकला आहे. जितेंद्रच्या नेटवर्थविषयी बोलायचं झालं तर तो सध्यस्थितीला ७ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.