In Pics: 50 वर्षांची झाली सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी, सलमान रश्दींवर केला होता खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:55 PM2020-09-03T14:55:13+5:302020-09-03T15:24:33+5:30

भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय.

भारतात जन्मलेली सुपरमॉडेल, अ‍ॅक्ट्रेस, टीव्ही होस्ट पद्मा लक्ष्मी आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय.

पद्मालक्ष्मी म्हणायला 50 वर्षांची आहे. पण बोल्डनेसच्या बाबतीत ती नव्या हिरोईन्सलाही मात देते.

स्वत:चे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करणारी पद्मा लक्ष्मी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते.

18 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात करणारी पद्मा लक्ष्मी 2018 मध्ये एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.

पॅरिस, मिलान आणि न्यू यॉर्क या तीन महत्वाच्या शहरांमध्ये मॉडेलिंग करणारी पद्मालक्ष्मी ही एकमेव भारतीय मॉडेल आहे.

स्पेनमध्ये कॅफेत बसलेली असताना एका मॉडेलिंग एजंटची तिच्याकडे नजर गेली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले.

2003 मध्ये प्रदर्शित ‘बूम’ या सिनेमात पद्मा लक्ष्मी कतरिना कैफसोबत दिसली होती. पण मॉडेलिंगमध्ये जागतिक स्तरावर कीर्ती मिळवलेल्या पद्मालक्ष्मीला अभिनय क्षेत्रात टीकाव लागला नाही.

‘बूम’ आपटला आणि हा सिनेमा आपटल्यानंतर अमेरिकेला परत जाऊन पद्मालक्ष्मीने टीव्ही शोवर लक्ष केंद्रीत केले.

पद्मालक्ष्मी ही पाककलेतही तज्ज्ञ आहे. तिने आतापर्यंत पाककलेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. शिवाय ‘पद्माज पासपोर्ट’ आणि ‘प्लॅनेट फूड’ हे दोन अमेरिकी टीव्हीवरचे फूड शोचे होस्ट केले आहेत.

2004 मध्ये पद्मा लक्ष्मीने लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. त्यावेळी रश्दी 51 वर्षांचे होते तर लक्ष्मी केवळ 28 वर्षांची होती. पण त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाहीत.

तीन वर्षांत पद्मा लक्ष्मीने रश्दींपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण तिने आॅटोबायोग्राफीमध्ये सांगितले आहे.

रश्दींसोबतचे लग्न म्हणजे ‘एक चुकीची गुंतवणूक’ असल्याचे तिने म्हटले होते. रश्दींना तिने निष्ठूर हसबंड म्हटले होते.

सलमान रश्दी हे असंवेदनशील होते. त्यांच्या असंवेदनशीलतेचा किस्साही पद्मा लक्ष्मीने सांगितला होता.

सेक्स दरम्यान मला फार त्रास होत होता. त्या भयानक त्रासामुळे मी नकार देत होते. मात्र किती सहज तुला बहाना करता येतो, असे म्हणून ते माझा मानसिक छळ करायचे़ माझ्या त्रासाचे कारण शरीरांतर्गत होता. त्यामुळे मला पाच तासांची सर्जरीही करावी लागली होती,असेही तिने म्हटले होते. 2007मध्ये पद्मा लक्ष्मी व सलमान रश्दी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.