बाबो..! 74 वर्षांच्या अभिनेत्याने सनी लिओनीकडे मागितले असे काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 02:39 PM2020-07-24T14:39:19+5:302020-07-24T14:45:01+5:30

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मात्र तिचा एक किस्सा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. 

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. मात्र तिचा एक किस्सा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. 

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचमध्ये सनी लिओनी गेली होती.

त्यावेळी तिच्यासोबत घडलेला किस्सा सातत्याने चर्चेत येतो आहे. 

खरे तर प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदीही कॅलेंडर लॉन्च कार्यक्रमात पोहोचले होते.

यावेळी कबीर बेदी सनी लिओनीला भेटले आणि इतर गोष्टींबरोबरच कबीरने सनीला तिचा फोन नंबर विचारला परंतु सनीने आपला नंबर देण्याऐवजी पतीचा नंबर दिला. 

कबीर बेदी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यत चार विवाह केले आहेत आणि त्यांची चौथी पत्नी त्याच्यापेक्षा जवळजवळ 29 वर्षांनी लहान आहे.

कबीर बेदी यांनी सनीचा नंबर मागितल्यानंतर तिने तिच्या पतीचा डॅनिअल वेबरचा नंबर दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती आणि अखेर याबाबत कबीर बेदींनी खुलासा केला होता.

डब्बू रत्नानीच्या पार्टीमध्ये मी सनीचा नव्हे तर तिच्या पतीचा डॅनिअल वेबरचाच नंबर मागितला होता आणि तिने तो दिला देखील. असे कबीर बेदी यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले.

आता माझ्याकडे डॅनिअलचा नंबर देखील आहे. मात्र माझ्याबद्दल जी चुकीची माहिती समोर येते ती अत्यंत अपमानास्पद आहे असे कबीर बेदी यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत टाईम स्पेंट करते आहे.

लॉकडाऊन दरम्यान सनी मुंबईतून अमेरिकेला गेली.

याच दरम्यान ती पती आणि मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.

Read in English