Happy Birthday Nushrat : ती पाहताच बाला.. ! बर्थ डे गर्ल नुसरत भरूचाचे काही ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 05:02 PM2020-05-17T17:02:29+5:302020-05-17T17:02:29+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिचं करिअर तर सध्या जोरावर आहे. तिचा करिअर ग्राफ वेगात वर चढत आहे. आज नुसरतचा वाढदिवस.

सध्या यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी सतत फ्लॉप होणाऱ्या सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती.

करिअरच्या सुरुवात नुसरतनं 'जय संतोषी माँ' या सिनेमातून केली होती.

2009 मध्ये तिचा 'कल किसने देखा' रिलीज झाला. 2010 मध्ये 'ताज महल'. हे सर्वच सिनेमा फ्लॉप झाले.

नुसरतला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो 'लव्ह सेक्स और धोका' या सिनेमातून.

'लव्ह सेक्स और धोका' या सिनेमातून. हा सिनेमा सुद्धा नुसरतला नशीबानं मिळाला होता. ज्या अभिनेत्रीला या सिनेमासाठी फायनल करण्यात आलं होतं तिनं ऐनवेळी सिनेमाला नकार दिला.

प्यार का पंचनामा सिनेमानं तिचं नशीब पूर्णपणे पालटलं.

2019 मध्ये रिलीज झालेला ड्रीम गर्ल हा तिचा सिनेमा सुपर हिट झाला.