जेव्हा 'या' अभिनेत्रीचा हा लूक बघून सारे झाले होते अवाक्, सलमान खाननही ओळखू शकला नव्हता तिचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 12:09 PM2021-01-14T12:09:39+5:302021-01-14T12:19:42+5:30

आणखी सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे आयशाचा चेहरा आणखी खराब झाला.

कधीकाळी आयशाच्या अभिनयासह तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा व्हायचे.

सलमान खानच्या 'वांटेड' या सिनेमात आयशा टाकिया मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमासाठी तिचे खूप कौतुक झाले होते.

मात्र सर्जरीनंतर आयशाला चाहते तर सोडाच सलमान खानसह सिनेमात काम करुनही तोही तिला ओळखू शकला नव्हता.

दिग्दर्शकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली. आयशाला या सर्जरीमुळे काम मिळणंही बंद झालं.

तिच्यावर घरी बसण्याची वेळ आली. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली. घरातून बाहेर पडणंही तिला कठीण बनलं होतं.

सर्जरीमुळे आयशा टाकियाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता.

आयशाने एकदा नाही तर अनेकदा तिच्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.

आयशा सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव्ह असते. सर्जरीनंतर तिने तिचा नवीन लूकमधला फोटो शेअर करताच सगळेच हैराण झाले होते.

आयशाने २००९ साली फरहान आजमीसह लग्न करत तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

सिनेमापासून दूर गेल्यानंतर आता आयशा संसारतच रमली.

आयशा तिच्या मुलांसह क्वॉलिटी टाइम एन्जॉय करताना दिसते.