एकदा नव्हे अनेकदा मलायका अरोरा झाली Oops Moment ची शिकार, फोटोच आहेत पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 06:28 PM2021-01-13T18:28:33+5:302021-01-13T18:35:33+5:30

वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा मलायकाचा चार्म मुळीच कमी झालेला नाही. एका मुलाची आई असलेल्या मलायकाची गणना बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते.

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात.

या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात.

त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात.

मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते.

असंच काहीसं घडलं होतं मलायका अरोराबरोबर ते एकदा नाही तर अनेकदा अशा प्रसंगाना ती बळी पडली आहे.

आयटम गर्ल म्हणून ती मलायका प्रसिद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी नेहमीच ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असते.

वेस्टर्न लूकला तिची विशेष पसंती दिसते. कधी शॉर्ट ड्रेसने तर कधी पारदर्शक ड्रेसमुळे तिला लाजीरवाणे व्हावे लागले आहे.

इतकेच नाही तर हे क्षण कॅमे-यातसुध्दा कॅप्चर झाले आहेत.

डिझाईन केलेली ड्रेसिंग स्टाईल मलायकाला पसंत आहे. मात्र हे डिझायनर ड्रेस मलायकासाठी डोकेदुखी ठरतात.

त्यामुळे चेह-यावरुनच ती नर्व्हस असल्याचे स्पष्ट जाणवते.