Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:40 PM2022-05-10T15:40:23+5:302022-05-10T15:47:43+5:30

RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे.

RRR च्या बंपर यशानंतर अभिनेता ज्युनियर NTR त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. RRR नंतर, टॉलिवूड सुपरस्टार ज्युनियर NTR ने त्याच्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक कोरटाला शिवासोबत हातमिळवणी केली आहे. याआधी त्या दोघांनी जनता गॅरेज या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे. अशा परिस्थितीत दिग्दर्शक कोरटाला शिवा आणि ज्युनियर एनटीआर यांच्या या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत.

RRR नंतर दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या या चित्रपटात आलिया भट अभिनेता ज्युनियर एनटीआर सोबत दिसणार होती. खुद्द अभिनेत्री आलिया भटनेही आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटातून वॉक आऊट केल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

यानंतर ज्युनियर एनटीआरसोबत आणखी एका मोठ्या बॉलिवूड स्टारला कास्ट केल्याची बातमी समोर आली आहे. यादरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या तिसाव्या चित्रपटासाठी अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव देखील समोर आले.

त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नावही समोर आले.

लेटेस्ट रिपोर्टनुसार, या तीन अभिनेत्रींना वगळून, निर्माता-दिग्दर्शक कोरटाला सिवा यांनी या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत साउथची अभिनेत्री साई पल्लवीला कास्ट केले आहे.

ज्युनियर एनटीआरच्या या आगामी चित्रपटासाठी निर्माता-दिग्दर्शकाने अभिनेत्री साई पल्लवीला कास्ट केल्याची चर्चा दक्षिण सिनेजगतात आहे.

साई पल्लवी ही तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. जिने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

साई पल्लवी अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सरदेखील आहे.

साई पल्लवी आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र काम करताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.