कधी काळी लॉटरी विकणारी नोरा फतेही आज आहे बॉलिवूडमधील स्टार, 'Bigg Boss'ने असं बदलले नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:35 PM2021-04-23T17:35:12+5:302021-04-23T17:35:12+5:30

नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

नोरा फतेही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. नोरा फतेहीने कधी वेटरचे काम केले आहे तर कधी पोट भरण्यासाठी नोरावर लॉटरी विकण्याची वेळही आली होती. (Photo Instagram)

एका मुलाखती दरम्यान नोरा म्हणाली होती की, स्ट्रगलिंगच्या दिवसांत ती PG म्हणून राहायची. त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यावर अनेक वेळा वाईट कमेंट्स केल्या जायच्या.(Photo Instagram)

स्ट्रगलिंगच्या दिवसांत तिचा सामना एका कास्टिंग एजेंटशी झाला होता. त्याने नोराच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अश्लिल कमेंट्स केल्या. नोराची ऑडिशन दरम्यान हिंदी न येत असल्यामुळे खिल्ली उडवली. (Photo Instagram)

'बिग बॉस 9' मध्ये सहभागी झाल्यानंतर नोराचे नशीब बदलले. नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.

नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय एक चांगली बेली डान्सर आहे. नोराने बरेच आयटम साँग केले आहेत जसे की साकी साकी, दिलबर आणि कमरिया. (Photo Instagram)

नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 26.4 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.