तरुणाईची 'दिल की धडकन' बनतेय नोरा फतेही, तिच्या प्रत्येक फोटोंंवर देतात अशा कमेटंस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:17 PM2020-10-05T12:17:03+5:302020-10-05T12:36:54+5:30

नोरा फतेही मोरोक्कनची प्रसिद्ध डान्सर आणि मॉडेल आहे. नोरा कमालीची डान्सर असून तिलाही सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करायला आवडतं. नुकतेच नोरा आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा एक व्हिडीओ अलीकडेच प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर टेरेंस सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. या व्हिडीओत कथितरित्या टेरेंस नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता.

नोरा फतेही बॉलिवूडची सर्वांत हॉट गर्ल बनली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नोराचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.

नोराचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात. फोटो शेअर होताच चाहत्यांच्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.

अलीकडेच नोराने साडी परिधान करत फोटोशूट केले, साडीतील तिच्या अदा पाहून चाहतेही फुल ऑन फिदा झाले.

वेस्टर्न असो वा पारंपरिक नोराचा स्टाईलसेंस तिच्या डान्सइतकीच अप्रतिम आहे.

नोरा सलमान खानच्या 'भारत' सिनेमात दिसली होती. त्याआधी ती 'साकी साकी रे आणि ‘दिलबर दिलबर’ गाण्यामुळे चर्चेत आली होती.

हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं होतं की आतापर्यंत १२ कोटींहून जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले होते.

आत्तापर्यंत ती 'दिलबर' गाण्यावर दोन वेगवेगळ्या भाषेत थिरकली आहे.

ग्लॅमरस ड्रेसपासून ते साडीपर्यंत तिचे लूक पाहून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.

सोशल मीडियावर सध्या तिच्या डान्सिंग स्टाइलने ती सा-यांनाच घायाळ करत आहे.

Read in English